Amit Shah On Sharad Pawar : देशाचे गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी शहा यांनी राज्यातील विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. महाराष्ट्राची जनता पन्नास वर्षांपासून शरद पवारांना सहन करत आहे असं म्हणत शहा यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी ठाकरेंपासून ते काँग्रेसपर्यंत सर्वच विरोधकांवर निशाणा साधला. | Amit Shah On Sharad Pawar
यावेळी शरद पवार यांना उद्देशून शहा म्हणाले,”पन्नास वर्षांपासून महाराष्ट्राची जनता तुम्हाला सहन करतेय. ५० वर्षं सोडा, फक्त ५ वर्षांचा हिशेब द्या” तसेच मी या ठिकाणी १० वर्षांचा हिशेब द्यायला आलोय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी केलेली कामे देखील यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितली. | Amit Shah On Sharad Pawar
सोनिया गांधींना राहुल यांना पंतप्रधान बनवायचंय. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय. शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे.असं म्हणत घराणेशाही पुढे नेणाऱ्या पक्षांना तुम्ही मतदान करणार का ? असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. | Amit Shah On Sharad Pawar
जे पक्ष घराणेशाहीने चालतात, ते देशाच्या लोकशाहीसाठी काम करू शकतात का ? इंडिया आघाडीचे सर्व पक्ष घमंडिया पक्ष आहेत असं देखील शहा यावेळी म्हणाले.यवतमाळ येथे झालेल्या सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आता लवकरच लोकसभेसाठीची भाजपची महाराष्ट्रातील यादी जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. | Amit Shah On Sharad Pawar