‘या’ व्हीडियोमुळे आमिरची मुलगी नेटकऱ्यांवर भडकली

मुंबई- अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खानने काही दिवसांपुर्वी नैराश्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हीडियोमुळे सिनेसृष्टीपासून दुर असलेली इरा या व्हीडियोमुळे चर्चेत आली आहे.

या व्हीडियोवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडीओवर अश्लील कमेंट्स, गलिच्छ भाषा वापरण्यात आलीय. त्यामुळे इरा नेटकऱ्यांवर चांगलीच भडकली आहे.

इराने या नेटकऱ्यांना झापले आहे. माझ्या मानसिक आरोग्याच्या व्हिडीओवर द्वेष पसरवणारी भाषा करून, अश्लील कमेंट्स, गलिच्छ भाषा वापरत असाल तर तुमच्या त्या कमेंट मी काढून टाकेल. त्यानंतरही तुमचे ट्रोलिंग सुरूच राहिले तर तुम्हाला मी ब्लॉक करून टाकेल, असा इशारा इराने ट्रोल करणाऱ्यांना दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.