अमेठीतून स्मृती इराणींचा उमेदवारी अर्ज दाखल

उत्तर प्रदेश : अमेठी या प्रतिष्ठीत मतदार संघात भाजपच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या यावेळी पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या आधी त्यांनी 17 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती मात्र त्या दिवशी सरकारी सुट्टी असल्याने त्यांनी आजच अर्ज दाखल केला आहे.

यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, भाजपचे या मतदार संघातील प्रमुख मोहसीन रझा आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते. गौरीगंज कलेक्‍टर कचेरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी बुधन माई मंदिरात जाऊन पुजा केली. त्यांचे अमेठी मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या तथा या मतदार संघातील विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी बुधवारीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमेठीत 6 मे रोजी मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.