हिरोईनच जास्त मोलाच्या

बॉलीवूड ही एक पुरुषप्रधान इंडस्ट्री आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण इथे अॅक्‍ट्रेस येतात आणि जातात. हिरो मात्र जास्तीत जास्त काळ इथे अॅक्‍टिव्ह असतात. हिरोईनपेक्षा हिरोला मिळणारे मानधनही जास्त असते. मात्र आता ट्रेन्ड बदलत चालला आहे. बॉलीवूडमधील काही हिरोईन आपल्या मानधनाच्या रकमेत अजिबात तडजोड करत नाहीत. हिरोपेक्षा आपले मानधन अधिक असले पाहिजे, याकडे काही हिरोईनचा कटाक्ष असतो. विशेषतः 5 हिरोईन आपल्या कोस्टारपेक्षा अधिक मानधन घेत असतात.

करीना कपूर जेंव्हा करीना कपूर-खान बनली तेंव्हा तिने आपली ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवली. तिने आपल्या नवऱ्याच्या मानधनापेक्षा आपले मानधन अधिक असावे, अशी मागणीच करायला सुरुवात केली. “कुर्बान’मध्ये तिने सैफपेक्षा अधिक मानधन घेतले होते. बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या हिरोईनमध्ये सर्वात पहिल्यांदा नाव घ्यायला लागते ते दीपिका पदुकोणचे. तिने तिच्या सर्वात वादग्रस्त ठरलेल्या “पद्मावत’साठी 13 कोटी रुपयांचे मानधन आकारले होते. अर्थात या सिनेमात काम केल्यास कान, नाक कापले जाण्याच्या धमकीलाही तिला सामोरे जावे लागले होते. शाहिद कपूरला 10 कोटी तर रणवीर सिंहला 11 कोटी मानधन मिळाले होते.

“हम आपके है कौन’ हा राजश्री प्रॉडक्‍शनचा एव्हरग्रीन सिनेमा होता. या फॅमिली ड्रामामध्ये माधुरी दीक्षितला सलमान खानपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. याच सिनेमातल्या अनुपम खेर यांनी एका वेगळ्या संदर्भात ट्विटरवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली होती.

बिग बी अमिताभ बच्चन यांना “ओव्हरटेक’ करण्याचे धाडस अद्याप कोणीही केले नव्हते. पण “पीकू’मध्ये पुन्हा एकदा दीपिका पदुकोणने अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळवले होते. “पीकू”च्या प्रमोशनदरम्यान ही बाब समोर आली होती. तर कंगणा रणावतने तर आता मानधनाच्या बाबतीत कहरच केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.