“डब्लूटीओ’मध्ये अमेरिकेची दादागिरी; चीनची जोरदार टीका

बीजिंग: जागतिक व्यापार संघटनेमध्ये चीनचा विकसनशील देशाचा दर्जा काढून घेण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. यातूनच अमेरिकेचा स्वार्थीपणा आणि अहंकारी वृत्ती दिसून येते, अशी टीका चीनने केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेतील अमेरिकेचे प्रतिनिधी रॉबर्ट लिग्तिझर यांना “मेमो’बजावला आहे. काही सुस्त देश विकसनशील अर्थसत्ता म्हणून ओळख मिरवत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचा हा इशारा चीनला उद्देशून असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या या शेरेबाजीतून त्यांचा स्वार्थी, लहरी आणि अहंकारीपणाच उघड झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुन्यिंग यांनी नैमित्तिक वार्तालापामध्ये म्हटले आहे.

कोणत्या देशाल विकसनशील देशाचा दर्जा मिळावा, हे केवळ एकाच देशाच्या मनावर अवलंबून असता कामा नये. वास्तवातील व्यापारी खरेपणा आणण्यासाठी चीनचा विकसनशील अर्थकारणाचा दर्जा कायम रहायला हवा, असेही चुन्यिंग यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.