पुणे महापालिकेतही आता रुग्णवाहिका

पुणे – महापालिका मुख्य इमारतीमध्येही 108 ही आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला आणि बालकल्याण समितीने याबाबतच्या सूचना आरोग्य विभागास केल्या होत्या.

मुख्य कार्यालयात सुमारे साडेचार ते पाच हजार कर्मचारी कार्यरत असून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकही उपस्थित असतात, अशा स्थितीत एखाद्या आपत्तीजनक स्थिती उद्‌भवल्यास तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी ही ऍम्ब्युलन्स महापालिकेत उभी केली जाणार आहे. महापालिकेत कामासाठी दररोज शेकडो नागरिकांचा राबता असतो. अशा वेळी एखादी वैद्यकीय स्थिती उद्‌भवल्यास संबंधिताला तातडीची आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था महापालिकेत नाही. अशा वेळी पालिकेच्या रुग्णालयातून ऍम्ब्युलन्स बोलावून संबंधितास उपचारासाठी नेले जाते. त्यामुळे पालिकेतही कायमस्वरूपी शासनाची “108′ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, या वाहनासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून जागा निश्‍चित करून घेतली असून डॉक्‍टरांच्या पथकालाही स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे वाहन तातडीने पालिका भवनात उपलब्ध करून द्यावे, यासाठी “बीव्हीजी’ कंपनीस आरोग्य विभागाकडून पत्र पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)