Ambati Rayudu : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याची तयारी केली आहे. त्याने वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. 37 वर्षीय रायडूने यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकणाऱ्या रायडूने चॅम्पियन बनल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 2019 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. रायडूने या वर्षी जूनमध्ये जगन मोहन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्याला मछलीपट्टणममधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाचा सदस्य
अंबाती रायडूला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. तो 2013, 2015 आणि 2017 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. याशिवाय, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेते झाले तेव्हा तो धोनीसोबत होता.
సీఎం క్యాంప్ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్ సమక్షంలో వైఎస్సార్ కాంగ్రెస్ పార్టీలో చేరిన ప్రముఖ భారత క్రికెటర్ అంబటి తిరుపతి రాయుడు.
ఈ కార్యక్రమంలో పాల్గొన్న డిప్యూటీ సీఎం నారాయణ స్వామి, ఎంపీ పెద్దిరెడ్డి మిథున్ రెడ్డి.#CMYSJagan#AndhraPradesh @RayuduAmbati pic.twitter.com/QJJk07geHL
— YSR Congress Party (@YSRCParty) December 28, 2023
रायडूने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी तो टीम इंडियाचा एक भाग होता आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याची निवड होण्याची शक्यता खूप जास्त होती. मात्र, निवड समितीने त्यांच्या जागी विजय शंकरला संधी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या रायडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. नंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला नाही.