लोणी धामणी- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, लोणी, वडगावपीर येथील शेतकऱ्यांनी काढलेल्या कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून अरण लावून शेतातच साठवून ठेवला होता. सध्या कांदयाचे भाव कोसळल्याने प्रती दहा किलो 80 ते 100 रुपये भाव मिळत आहे. त्यामूळे लॉकडाऊन आज ना उद्या ऊठेल आणि कांदयाला बाजारभाव वाढतील या आशेवर कांदा निवडून वखारीत ठेवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे, अशी माहीती धामणी येथील शेतकरी केरभाऊ मारूती बढेकर यांनी सांगितले.