रेडा-इंदापूर तालुक्यातील पळसदेव व बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील डॉक्टर, कर्मचारी, आशावर्कर व इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने सॅनिटायझर, व मास्कचे वाटप माजी बांधकाम सभापती प्रविण माने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुरेखा पोळ, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ, मिलिंद यादव, डॉ. विकास गार्डे, डॉ. सुवर्णा शिंदे, डॉ. प्रियंका जागाकोस, पर्यवेक्षक गणेश मोरे, सुपरवायझर अशोक कंबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.