मुंबई – अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. गेल्या काही वर्षापासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे यांच्या लग्नाच्या चर्चाही होताता दिसून येत आहेत. दोघांचेही चाहते लग्न कथी करणार आहे? अशी सोशल मिडियावर विचारणा करत आहेत. अशातच आलियाने आम्हा दोघांचे लग्न झाले आहे असा तिच्या आणि रणबीरच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.
आलियाने लग्नाबासंदर्भात हा खुलासा एका मुलाखती द्वारे केला आहे. याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली की, माझ्या मनात मी आधीच रणबीरशी लग्न केले आहे. खरं तर, मी रणबीरशी खूप दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आता जेव्हाही आम्ही लग्न सोहळा करू तो खूप चांगल्या पद्धतीने होईल.’
2017मध्ये एका एका चित्रपटाच्या वेळी आलिया-रणबीरची भेट झाली होती. त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला दोघांनाही त्यांचे नाते लपवून ठेवले मात्र अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात हे एकत्र दिसले. त्यानंतर या दोघांचे नाते सर्वांसमोर आले.