alia bhatt – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (nantional award) हा सर्वात प्रमुख आणि प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार सोहळ्यांपैकी एक मानला जातो. आज 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार (nantional award) सोहळ्याचे वितरण पार पडले.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चित्रपट कलाकारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्री आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt)आणि क्रिती सेनन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला.
आलियाला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी तर क्रिती सेननला (kriti sanon) ‘मिमी’साठी पुरस्कार मिळाला. तर, दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुनला (allu arjun) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘पुष्पा : द राइज’साठी मिळाला.
View this post on Instagram
दरम्यान, सोहळ्यासाठी आलिया भट्टने खास लूक केला होता. आलियानं तिच्या लग्नसोहळ्यात नेसलेली साडी ही राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली. तिच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
आलियानं तिच्या लग्नसोहळ्यात व्हाईट आणि गोल्डन कलरची साडी नेसली होती. लग्नसोहळ्यात नेसलेली साडी आलियानं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली आहे.
आलियानं या खास कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या लूकसाठी तिच्या लग्नातील साडीची निवड केल्यामुळे अनेक नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आलियानं नेसलेली ही साडी सब्यसाचीने डिझाइन केली होती.
आलिया ही तिचा पती अभिनेता रणबीर कपूरसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात रणबीर कपूर ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसला. सोशल मीडियावर सध्या या आलिया-रणबीरची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.