अक्षयची इच्छा

सध्या रिमेक चित्रपटाचा ट्रेंड वाढला आहे. दक्षिणेकडच्या चित्रपटाच्या रिमेकबरोबरच बॉलीवूडचे अनेक क्‍लासिक चित्रपटांनादेखील पुन्हा नव्याने आणले जात आहे. सडक-2, पती, पत्नी और वो यासारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे. या वातावरणामुळे अक्षय खन्नालादेखील रिमेक चित्रपटात काम करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. मात्र हा चित्रपट अन्य नायकाचा नाही तर तो वडिलांच्या एखाद्या चित्रपटाच्या

रिमेकपटात काम करण्याची मनिषा बाळगून आहे. विशेषत: 1971 मध्ये प्रदर्शित झालेला विनोद खन्ना, मीना कुमारी आणि शत्रुघ्न सिन्हांचा चित्रपट “मेरे अपने’ हा चित्रपट अक्षय खन्नाचा आवडीचा. जर आपल्याला एखाद्या रिमेकपटाची संधी मिळाली तर वडिलांच्या “मेरे अपने’मध्ये काम करण्याची तयारी आहे, असे तो म्हणतो.

दिग्दर्शक म्हणून गुलजार यांचा तो पहिला चित्रपट होता. राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेला बंगाली चित्रपट “अपंजन’चा तो हिंदी रिमेक होता. त्याचे दिग्दर्शन तपन सिन्हा यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.