अक्षयची “दिग्दर्शिका’

बॉलीवूड अभिनेत्री आणि अक्षयकुमारची पत्नी ट्‌विंकल खन्ना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सदैव चर्चेत असते. नेटकऱ्यांशी ती खूपशी जोडली गेलेली आहे. तिचे चाहतेही तिला अनेक प्रश्‍न विचारत असतात, तिच्यावर चांगल्या-वाईट कमेंटस्‌ करत असतात.

अलीकडेच तिला तू अक्षयकुमारच्या चित्रपटाचे दिग्दर्शन का करत नाहीस, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. याबाबत तिने नकार देताना म्हटले आहे की, मी अक्षयच्या वास्तव आयुष्यातील दिग्दर्शिका आहे आणि त्यात मी खूश आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांना दिग्दर्शित करण्याची माझी जराही इच्छा नाही.

किंबहुना, अक्षयला दिग्दर्शित करणे हे अत्यंत कठीण काम आहे, असेही ती सांगते. ट्‌विंकल लवकरच आपली स्वतःची वेबसाईट सुरू करणार आहे. या संकेतस्थळाचे नाव “ट्‌विक’ असे असणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी अधिक जोडली जाणार आहे. तसेच वेगवेगळ्या विषयांवरील आपली मतेही मांडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.