कोल्हापूर – काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून माजी गृहराज्यमंत्री आणि सध्या विधान परिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. आज नवरात्रीतील पंचमीचा मुहूर्त साधत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून ऋतुराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत दाखल केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत असताना जोरदार घोषणाबाजी देखील केली तर आमदार सतेज पाटील, पत्नी प्रतिमा पाटील, संजय पाटील यांचेसह काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते हे दसरा चौकातून पदयात्रा करत जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. यानंतर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.