मुंबई – बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या फिटनेससाठी खास करून ओळखला जातो. वयाची पन्नासी ओलांडल्यानंतरही ती आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसतो. अक्षय कुमार अनेकदा त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. असाच त्याचा एक अंडरवॉटर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वयाच्या 56 व्या वर्षातील त्याचा जोश पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
अक्षय कुमारने इनस्टाग्रामवर त्याचा अंडरवॉटर वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘हॅपी मॉर्निंग मित्रांनो! मी आताच वर्कआऊट पूर्ण केलं. मला पूर्ण शरिराच्या वर्कआऊटसाठी पाण्यात व्यायाम करायला आवडतं. यामुळे सांधेदुखी होत नाही. आणि पाण्यात श्वास रोखून धरणं सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. आता माझी फुप्फुसंही दिवसभर संघर्ष करण्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही सुद्धा आज व्यायाम केला असेल तर थम्सअप द्या. चीयर्स’
या व्हिडिओमध्ये अक्षय पाण्यात व्यायाम करताना दिसत आहे. तो पाण्यामध्ये क्रंचेससह व्यायामाच्या अन्य प्रकारांचाही सराव करत असल्याचे पाहायला मिळतेय. या व्यायाम प्रकारास ‘अॅक्वा एक्सरसाइज’ किंवा ‘अॅक्वा वर्कआऊट’ असे म्हणतात. अक्षय नेहमीच त्याच्या वर्कआऊटद्वारे चाहत्यांना देखील प्रेरणा देत असतो. त्याचा या वयातील वर्कआऊट तरुण वर्गाला लाजवेल असा आहे. आजही त्याचा कामातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
View this post on Instagram
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयसह परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अक्षय ‘हेरा फेरी 3’ ‘हाऊसफुल 5’ आणि ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. नुकताच त्याचा OMG 2 हा चित्रपट रिलीज झाला होता.