Entertainment – अभिनेता पंकज त्रिपाठी नेहमीच आपल्या खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. नुकताच अक्षय कुमारसोबत तो ‘ओएमजी 2’ दिसला होता. अशात पंकज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंकज त्रिपाठीने घोषणा केली आहे की ते कधीच चित्रपटांमध्ये शिवीगाळ करणार नाही. जितका जमेल तितका प्रयत्न करणार की एखाद्या चित्रपटाच्या भूमिकेत शिवीगाळ करणार नाही त्या सीन ला प्रेक्षकांसमोर मांडतांना क्रिएटिव पद्धतीने मांडणार आहे. असेही पंकज त्रिपाठी यांनी सांगितले.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीने सांगितले की नेटफ्लिक्स वेब सीरीज ‘मिर्जापुर’मधील माझा किरदार दमदार होता, या सिरीजमध्ये असे काही शब्द वापरण्यात आले की ज्याचा काही अर्थच लागत नव्हता. पंकज पुढे म्हणाला, चित्रपटातील काही पात्रामुळे शिवीगाळ केली, ते पण फक्त ३ ते ४ वेळा जसे कि मिर्जापुर’ मध्ये कधी कधी पात्राला प्रामाणिकपणे दाखविण्यसाठीच हे करावे लागते. मात्र मी नेहमीच हा विचार करतो की कुठलीही कथा यामुळे पुढे जाऊ शकते. चित्रपट आणि वेबसिरीज साठी ते किती महत्वाचे आहे तेव्हाच मी या साठी मान्य करतो.’ Pankaj Tripathi , Abouse On Screen, Upcoming Projects
आता मी ठरवले आहे एखाद्या पात्रासाठी हे आवश्यक असेल तरी सुद्धा मी शिवीगाळ करणार नाही. फिल्ममेकिंग एक क्रिएटिव प्रोसेस आहे त्यामुळे शिवीगाळ ऐवजी त्या सिनमध्ये काय वेगळं करता येईल याचा विचार करायला हवा.मिर्जापूरबाबत सांगताना पंकज पुढे म्हणाला, मिर्जापूर साठी मी सुद्धा काही ठरवले होते, विशुद्ध पोरगा आहे तू …. मात्र याचा काहीच अर्थ नव्हता मिर्जापूर सर्वात लोकप्रिय इंडियन वेबसिरीज पैकी एक आहे. या वेबसिरीजचा तिसरा भाग या वर्षाच्या अखेरीस येणार आहेया सिरीजमध्ये पंकज त्रिपाठीने कालीन भैया नावाच्या डॉनची भूमिका निभावली आहे. जो मिर्जापूर शहर चालवतो. दरम्यान पंकज त्रिपाठी यांनी मिमी चित्रपटातील भूमिकेसाठी नुकताच बेस्ट सपोर्टींग अभिनेत्याचा अवॉर्ड जिंकला होता. Pankaj Tripathi , Abouse On Screen, Upcoming Projects