बॉलिवूडमधील खिलाडी अर्थात अक्षय कुमार सध्या फॉर्मात असून दरवर्षी त्याचे 3 ते 4 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 2019मध्येही असेच होण्याची शक्यता आहे. कारण “केसरी’ आणि “मिशन मंगल’नंतर आता दिवाळीत त्याचा “हाउसफुल-4′ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय हा वेळेबाबत खूपच सजग असल्याने “हाउसफुल-4’च्या शूटिंगवरही त्याचा चांगला परिणाम झाला.
या चित्रपटाचे निर्मात हा चित्रपट 90 दिवसांत पूर्ण करणार होते. मात्र, अक्षयमुळे हे शूटिंग फक्त 65 दिवसांत पूर्ण करण्यात आले. अक्षय हा आपले शूटिंग वेळेपूर्वीच सुरू करत असे आणि त्याला को-स्टार्सही खूपच सहकार्य करत होते. यामुळेच शूटिंग हे वेळे आधीच पूर्ण करण्यास यश मिळाले.
विशेष म्हणजे, इतर कलाकारांनीही शूटिंगला वेळेवर हजेरी लावली. यासाठी अक्षयने एक यूनिक आयडिया शोधली होती. सर्व कलाकारांना माहित होते की, अक्षयसोबत काम करण्याचे म्हणजे सकाळीच शूटिंग करावे लागणार. यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच तसे माइंड मेकअप केले होते. तसेच जे स्टार्स वेळेवर येत होते, असा स्टार्सना अक्षय कुमार गिफ्ट किंवा स्वादिष्ट जेवणाचे सरप्राईज देत असे.
अक्षय हा को-स्टार्ससोबत बोलता-बोलता त्यांच्या आवडते खाद्यपदार्थ आणि डिशेज विचारून घेत असे आणि पुढील दिवशी सरप्राईज म्हणून त्यांना देत.