प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझाने आपल्या लग्नाचा 20 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याने पत्नी लिझलबरोबर तिसऱ्यांदा लग्न केले आहे. लग्न समारंभमध्ये रेमो आणि लिझल दोघांच्याही घरचे लोक सहभागी झाले होते.
एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील बरेच स्टार या एकाच दाम्पत्याच्या तिसऱ्या लग्नाला आवर्जुन हजर राहिले होते. हे तिसरे लग्नही ख्रिश्चन पद्धतीने अगदी सर्व रितीरिवाजांसह पार पडले. रेमो सध्या “स्ट्रीट डान्सर’- 3 डी च्या कोरिओग्राफीमध्ये बिझी आहे.
या सिनेमातील् वरुण धवन आणि श्रद्धा कपूरही या लग्नाला आवर्जुन हजर राहिले होते. वरुण धवनने या लग्न समारंभाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आणि रेमो-लिझलला शुभेच्छा दिल्या आहेत.
“लोकांना एकदा लग्न करता येत नाही. तुम्ही तिसऱ्यांदा लग्न करत आहात. त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.’ असे वरुण धवनने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
वरुण आणि श्रद्धाचा “स्ट्रीट डान्सर 3 डी’ 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. यामध्ये प्रभुदेवा आणि नोरा फतेहीपण लीड रोलमध्ये असणार आहेत.