अकोला – मानसिक त्रासाला कंटाळून केटरर्स चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पेश उपाध्याय (वय -34, जयहिंद चौक परिसर, अकोला) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
उपाध्याय यांचा अकोल्यात केटरर्सचा व्यवसाय होता. सोमवारी उपाध्याय यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली असून त्यात तिंघाच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. लाॅकडाऊन काळात तिघांनी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचे नोटमध्ये लिहिले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सध्या पोलिसांनी सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या नावांवरून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी जुने शहर पोलीस तपास करत आहेत.