मुंबई : “चोर आले, ५० खोके घेऊन किती बघा, चोर आले, एकदम ओके होऊन” हे रॅप सोंग सध्या शोषलं मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे रॅप गाणारा तरुण कलाकार राज मुंगसे एका रात्रीत प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याचं हे रॅप व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेला विरोधी पक्षांकडून विरोध होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रॅप सिंगर राज मुंगसे याला खोक्यावरून रॅप साँग केलं म्हणून उचलून तुरुंगात डांबण्यात आलेलं आप सर्वांनी पाहिलं आहे. मुळात त्या रॅपमध्ये त्याने कुणाचंच नाव घेतलेलं नव्हतं. तो बिचारा फक्त खोक्यावरून गाणं गात होता. पण या महाभागांनी (एकनाथ शिंदे सरकार) तर ते खोकेबहाद्दर आहेत याची एकप्रकारे स्वतःहून कबुलीच दिली आहे. हल्ली खोका म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या डोळ्यासमोर कोण येतं ते आता सर्वांना माहिती आहे,” अशी खोचक अजित पवार यांनी यावेळी केली आहे.
नवोदित रॅप्पर ज्याच्यावर ह्या बेकायदेशीर सरकारने बेकायदेशीर कारवाई केली आहे. आज आपल्या सवरवन मदत करावीच लागेल राजला.@rautsanjay61 @Awhadspeaks @KapilSibal @DrAMSinghvi @advKapilMadan@Anand_Dasa88@Chav0_#ISupportRajMungase#FreedomOfExpression pic.twitter.com/fc296LvKyT
— अमितभाऊ 𑘀𑘦𑘲𑘝𑘥𑘰𑘄 (@Amityji127) April 6, 2023
दरम्यान, एकीकडे नेतेमंडळी केवळ या अटकेचा निषेध करत असताना विधीज्ञ असीम सरोदे राज मुंगसेची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. असीम सरोदे यांनी हे रॅप ट्विटवर रीट्विट केले आहे. तसेच त्यांच्या ट्विटमध्ये सरोदे यांनी म्हटले, हा रॅपर कुठे आहे? कोणत्या शहरातील आहे कृपया कळवावे. मी आणि आमची लीगल टीम (कायदेविषयक पथक) त्याला सगळी कायदेविषयक मदत देईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे दाबणे अयोग्य आहे. बेकायदेशीरतेच्या वाटेवर जाणाऱ्या आताच्या सरकारला आमि नंतर कुणीही सत्तेत येईल त्यांना कायद्याचे पुस्तक दाखविण्यात येईल. असे म्हटले आहे.
राज मुंगसे याच्या रॅप सॉंग मुळे तो एका रात्रीत फेमस झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपल्या रॅपमध्ये राज्यातील सत्तांतराचे नाट्य गायले आहे. या वरूनच त्याला आता अटक करण्यात येत आहे.