अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सोमवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी अजित पवार यांना शपथ दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार (60) यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी प्रथम नोव्हेंबर २०१० मध्ये शपथ घेतली, त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये, त्यानंतर नोव्हेंबर २०१९ फडणवीस सरकारमध्ये अवघ्या 80 तासासाठी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली होती.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही एकापेक्षा अधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रथम ऑक्टोबर १९९९ आणि त्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये उपमुख्यमंत्री काम पहिले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.