मुंबई – महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला असून नव्या मंत्रिमंडळामध्ये एकूण ३६ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रीपद वाट्यास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘भाजप’ प्रकरणानंतर देखील अजित पवार यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून उपमुख्यमंत्रीपदाची धुरा अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुळेंनी आपले बंधू अजित पवार व वाहिनी सुनेत्रा पवार यांच्यासोबतच एक फोटो देखील जोडला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून @AjitPawarSpeaks दादा यांनी शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर दादा आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबतचा हा प्रसन्न क्षण. pic.twitter.com/OSjcXAfhUI
— Supriya Sule (@supriya_sule) December 30, 2019