मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांचे वडील वीरू देवगन खूप मोठे अॅक्शन डायरेक्टर होते. स्टंट आणि अॅक्शन सीक्वेन्स दिग्दर्शनाशिवाय वीरू देवगनने ‘हिंदुस्तान की कसम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
या चित्रपटात अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच, त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. अजय देवगन आपले वडील वीरू देवगण यांना आपले प्रेरणास्थान मानतात. अलीकडे, अजय देवगण व्हिडिओचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या व्हिडियोत ते त्यांच्या जुन्या आठवणी शेअर करत आहेत. त्यात अनेक किस्से सांगितले आहे. एकदा एक मजेदार किस्सा घडला होता. त्यावेळी एका लहान मुलामुळे अनेक लोक आमच्याभोवती जमले होते. ही गोष्ट कधी अजयच्या बाबांना कळली माहित नाही ते थेट 100-250 फायटर्स लोकं घेऊन त्या स्थळी पोहचले होते. हा एकदम हिन्दी चित्रपटासारखा होता.