नवी दिल्ली – अगोदरच एअरटेल कंपनीवर बरेच कर्ज आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कंपनी आणखी भांडवल उभारणी करणार आहे.
कंपनीने ही माहिती शेअर बाजारांना दिल्यानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव चार टक्क्यापर्यंत कमी झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीला भांडवल उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. ही भांडवल उभारणे कशा पद्धतीने करायची याचा निर्णय संचालक मंडळ लवकरच घेणार आहे.