इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्‍स्टर कालवश

लंडन – इंग्लंडचे माजी कर्णधार व एमसीसी क्‍लबचे माजी अध्यक्ष टेड डेक्‍स्टर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. डेक्‍स्टर हे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जात होते तसेच ते मध्यमगती गोलंदाजही होते.

समकालीन क्रिकेटपटू त्यांना लॉर्ड टेड या नावाने संबोधत होते. 1958 ते 1968 या दहा वर्षांच्या काळात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी 62 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 30 सामन्यांमध्ये ते इंग्लंड संघाचे कर्णधार होते.

डेक्‍स्टर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 47.89 च्या सरासरीने 4 हजार 502 धावा केल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 21, हजारपेक्षा जास्त धावा केल्या असून 400 पेक्षा जास्त बळीही घेतले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे आणि मेरिलीबोर्न क्रिकेट क्‍लबचेही (एमसीसी) ते अध्यक्ष होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.