नवी दिल्ली: एक्सप्रेस वे वर हवाई दलाच्या चिता हेलीकॉप्टरने आज खबरदारीचा उपाय म्हणून इमर्जन्सी लॅंडिंग केले. हवाई दलाच्या नियमित सरावासाठी हे चीता हेलिकॉप्टर हिंदनहून हलवाराकडे जात होते.
हिंदनपासून अंदाजे 14 एनएम अंतरावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेस वे वर खबरदारीचा उपाय म्हणून लॅंडिंग केले. हेलिकॉप्टर सोनीपतपासून सुमारे 10-12 किमी अंतरावर कुंडली-गाझियाबाद-पलवल किंवा पूर्व परिघ एक्सप्रेसवेवर उतरले.
वैमानिकांनी केलेली कृती त्वरित आणि योग्य होती. यात कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. हिंदनहून लगेचच दुरुस्तीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. हेलिकॉप्टर दुरुस्त केले गेले आणि हिंदन येथे तातडीने आणि सुखरूप परत आले आहे, अशी माहिती हवाई दलाच्यावतीने देण्यात आली.