गाडेकर महाराज; माजी सैनिक फाउंडेशनतर्फे शिंगवेत वृक्षारोपण
नगर (प्रतिनिधी) – पर्यावरण संवर्धनासाठी सरसावलेल्या नगरमधील जय हिंद फाउंडेशनच्या कामाचा सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा. माजी सैनिकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या या उपक्रमाने निसर्गात पुन्हा निश्चितच बदल होतील, असे प्रतिपादन ह.भ.प. गंगाधर गाडेकर महाराज यांनी केले.
नगरमधील जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने शिंगवे केशव (ता. पाथर्डी) येथे वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी सैनिकांचे जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धनाचा उपक्रम सुरु आहे. सरपंच बापूसाहेब आव्हाड, खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हरेर, मजलेचिचोंलीचे सरपंच अमित आव्हाड, विजय आव्हाड, चेअरमन केशव गाडेकर, सोपान घोरपडे, सुभाष घोरपडे, आत्माराम घोरपडे, अर्जुन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, संजय घोरपडे, संभाजी काळे, बाळासाहेब गाडेकर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
जय हिंद फाऊंडेशनचे नेवासा अध्यक्ष अशोक चौधरी, महादेव आव्हाड, जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, संजय पालवे, दिलिप गीते आदींनी त्यासाठी परिश्रम घेतले. गावातील केशव गोविंद मंदीर, भैरवनाथ मंदीर, भक्तीधाम, श्रीराम मंदिर परिसरात झाडे लावण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सैनिकांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला. संतोष मगर यांनी आभार मानले.