नेवासा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर (ता.नेवासा) येथे हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाण म्हणून प्रत्येक महिलांना रोपे देण्यात आली. या उपक्रमांमधून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा छाया कापसे, पोलीस पाटील अॅड स्मिता लवांडे या होत्या. मुख्याध्यापिका सोनाली भुसारी यांनी संक्रांतीच्या वाण वाटपाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून तिळगुळ वाटप कार्यक्रमातच महिलांना वाण म्हणून झाडांची रोपे वाटली. वृक्षाचे सर्वांचे संवर्धन करावे व दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन भुसारी यांनी केले.
नागापूर जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षिका योगिता गिरी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अर्चना कापसे, मनिषा जावळे, वर्षा कापसे, अलका काळे, राधा लांजेवार, मोनिका वैरागर, योगिता कापसे, जयश्री आढागळे, पूजा खरे , कविता काळे, रोहिणी काळे, रत्नमाला खरे, स्वाती लवांडे, वर्षा काळे, महिला – पालक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य उपस्थित होत्या.