नगर – स्लॅबच्या प्लेटा काढून चोरून नेणार्यांना तोफखाना पोलिसांनी १२ तासात जेरबंद केले. रोहित विष्णू शिंदे (वय २०), शंकर मारुती शिंदे (वय २९), सागर शंकर शिंदे (वय २१) तिघे रा. पवन नगर,नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पवन नगरमधील मार्क कस्ट्रक्शन येथील बांधकामावर स्लॅब टाकलेला होता. परंतु वरील आरोपींनी स्लॅबच्या प्लेट चोरून नेल्याची फिर्याद गोरक्षनाथ भानुदास गुंड (रा.शेंडी) यांनी दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीच्या 30 स्टिलच्या प्लेटा, 25 हजार रुपये किमतीची दुचाकी असा ४० हजारांचा मुद्देमाल तोफखाना पोलिसांनी हस्तगत केला.
पुढील तपास पोलीस सुधीर क्षिरसागर करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पाहेकॉ सुनील शिरसाट, दिनेश मोरे, भानुदास खेडकर यांच्या पथकाने केली.