शेवगाव – तालुका विधी सेवा समिती, शेवगाव वकील संघ, पंचायत समिती, तसेच सावली दिव्यांग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शेवगावच्या प्रधान न्या. संजना जागुष्टे होत्या. या वेळी दिवाणी न्यायधीश व्ही. बी. डोंबे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. बेंद्रे, गटविकास अधिकारी राजेश कदम, वकील संघांचे ॲड. अविनाश शिंदे, ॲड. अभिषेक इखे, ॲड. संभाजी देशमुख, ॲड. मुनाफ शेख, कोर्ट कर्मचारी मनीषा खिलारी, विस्तार अधिकारी सचिन भाकरे, सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, मनोहर मराठे, खलील शेख, अनिल विघ्ने, बाबासाहेब गडाख, गणेश महाजन, सुनील वाळके, किशोर अंगरख, गणेश तमानके, अंजली खरात, रजिया शेख, चंद्रकला काळे, सकू मिसाळ, वंदना तुजारे, निलोफर शेख उपस्थित होते.
न्या. जागुष्टे यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अधिकाराबाबत कायदेविषयक माहिती देऊन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या. गटविकास अधिकारी कदम यांनी दिव्यांग बांधवांना मोदी आवास योजनेत प्राधान्य दिले जाईल, तसेच रोजगारासाठी बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड करून मनरेगा अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल, तसेच दिव्यांग ५ टक्के निधी शंभर टक्के खर्च करण्यात येईल, याची ग्वाही दिली.
सरकारने दिव्यांगांना व्यवसायासाठी हरित उर्जेवर चालणारे वाहन देण्याची घोषणा केली असून, दिव्यांगांनी ऑनलाइन अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेख यांनी या वेळी केले.