नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद प्रवाशांकडूनक्रू मेंबर किंवा सहप्रवाशाला त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच सावळा गोंधळ इंडीगो च्या विमानात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मद्यधुंद तरुणाने विमानातील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
दिल्लीवरुन बंगळुरूला जाणााऱ्या विमानातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत एका 40 वर्षीय प्रवाशाने विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरूला पोहोचताना या प्रवाशाला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
Drunk passenger held for trying to open emergency door flap of Delhi-Bengaluru IndiGo flight
Read @ANI Story | https://t.co/DubrP5WUh5#Indigoflight #drunkpassenger #emergencydoor#DelhiBengaluruflight pic.twitter.com/flFaInwaNi
— ANI Digital (@ani_digital) April 7, 2023
इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, विमान 6E 308 दिल्लीहून बंगळुरूला जात असताना त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजाचा फ्लॅप उघडण्याचा प्रयत्न केला.
मद्यधुंद प्रवाशाचे वर्तन पाहून क्रू मेंबर आणि वैमानिक सर्तक झाले. त्यांनी प्रवाशाला वॉर्निंग दिली. त्यानंतर विमान बंगळुरूला सुरक्षित लॅण्ड करण्यात आल्यानंतर त्याला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानात असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत.