मुंबई – अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘मजामा’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
गाण्याचे ‘शीर्षक बूम पडी है’ हे आहे. क्रुती महेश यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात माधुरी दीक्षितचे नृत्य आणि तिचे भाव जबरदस्त दिसत आहेत. माधुरीचा हा डान्स पाहून चाहत्यांना तिचा जुना चित्रपट आजा नचले आठवला आहे.
फेस्टिव्ह मोडमधील हे गाणे श्रेया घोषाल आणि उस्मान यांनी गायले आहे तर सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. मजामा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
मजामा हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आनंद तिवारी दिग्दर्शित आहे. मजामामध्ये गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंग, मल्हार ठाकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.