शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोष केला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, शिवसेना उपतालुका प्रमुख आनंदा हजारे, शिवसेना शेतकरी सेना तालुकाध्यक्ष हनुमंत लांडे, उपविभाग प्रमुख नाना गिलबिले, गटप्रमुख गणेश गिलबिले, बाळासाहेब दाते, मच्छिंद्र सासवडे, पोपटराव टेमगिरे, रवि चव्हाण, योगेश सासवडे, बंटी गिलबिले यांसह आदी शिवसैनिकांनी एकत्र येत फटाके वाजवून, एकमेकांना पेठे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अनेक शिवसैनिकांना भावना अनावर झाल्या होत्या.