पुणे : रस्त्यावर थुंकल्याने महापालिकेने संबंधित व्यक्तीला शर्ट काढून थुंकी पुसायला लावली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा थुंकी बहाद्दरांवर कारवाई सुरू केली आहे. या आधीही शहर स्वच्छता अभियानांतर्गत अशा कारवाई केल्या जात होत्या. तरीही नागरिकांमध्ये जागृती होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.