Bipasha Basu : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा सर्वांना दाखवला. काही महिन्यांपूर्वी रणबीर-आलिया यांनी मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवू नये, असे आवाहन केले होते.
मात्र अनेक दिवसांपासून चिमुकल्या ‘राहा’चा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर काल ख्रिसमसच्या दिवशी आलिया आणि रणबीरने राहाची झलक चाहत्यांना दाखवली. सध्या राहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, अश्यातच आणखी एका बॉलीवुड कपल ने आपल्या लाडक्या मुलीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीचा ‘देवी’चा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.
View this post on Instagram
देवीचा फोटो पाहून चाहत्यांना तिच्या क्यूटनेसचे वेड लागले आहे.बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर गेल्या वर्षी आई-वडील झाले. देवीच्या जन्मापासून बिपाशाचे कुटुंब चर्चेत आहे. यंदा देवीने तिचा पहिला वाढदिवस दिवाळीला साजरा केला.
त्यानंतर चाहत्यांना वाटले होते की बिपाशा आणि करण आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवतील पण आता त्यांची इच्छा ख्रिसमसच्या दिवशी पूर्ण झाली आहे. बिपाशा बसूने देवीचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा बाजूचा चेहरा दिसत आहे. रेड कलरचा ड्रेस आणि हेअरबँडमध्ये देवी खूपच क्यूट दिसत आहे.