11 वर्षांनंतर एकत्र

बॉलीवूडमध्ये काही जोड्या रूपेरी पडद्यावर खूप छान दिसल्या आणि गाजल्याही. पण काही कारणास्तव या जोड्या विशिष्ट काळानंतर पुन्हा झळकल्या नाहीत. आता राणी मुखर्जी आणि सैफ अली खानचेच उदाहरण घ्या ना! “हम तुम’, “तारा रम पम’ आणि “थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटांमधून सैफ आणि राणीची जोडी पडद्यावर दिसली. यातील हम तुमची चर्चा तुफान झाली.

पण यानंतर गेल्या 11 वर्षांमध्ये या जोडगोळीचा एकही चित्रपट रूपेरी पडद्यावर आला नाही. आता “बंटी और बबली’ या चित्रपटाच्या सिक्‍वलच्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

18 वर्षांनंतर बनवण्यात येत असलेल्या या सिक्‍वलपटात नायक म्हणून आधी अभिषेक बच्चनची निवड झाली होती; पण आता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील आठवड्यापासून बनारस आणि बुलंदशहर येथे सुरू होणार आहे. यशराज फिल्म या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.