वालचंदनगर (वार्ताहर) – येथील पंचक्रोशीतील प्रसिद्ध वकील अॅड. तेजल अरूण वीर यांची नोटरीपदी निवड करण्यात झाली आहे. यानिमित्ताने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच वीर यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
वालचंदनगर ग्रामपंचायतचे सदस्य अरुण वीर यांची कन्या तेजल अरुण वीर या ठिकाणी गेले काही वर्षांपासून वकिली व्यवसाय करतात. आता नोटरीच्या माध्यमातून कायदेशीर काम पार पाडत असताना अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे,
शपथ घेणे, कागदपत्र प्रमाणित करणे व व्यवहाराची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार नोटरीद्वारे प्राप्त झाला आहे. या निवडीबद्दल वालचंदनगर व परिसरात व वीर यांची परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अभिनंदनचा वर्षा होत आहे.