मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द सह 30 ग्रामपंचायतींवर ऑगस्ट महिन्यात प्रशासक नेमले जाणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
शासननिर्णयानुसार प्रशासक नेमण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार 21 ऑगस्टपर्यंत प्रशासक नेमणार आहे. पुढील 30 ग्रामपंचायतींवर – गुरुवारी (दि. 20 ऑगस्ट) – गावडेवाडी, लांडेवाडी/पिंगळवाडी, कोळवडी, कोटमदरा, पिंपळगाव, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापूर बुद्रुक, शिंगवे, गिरवली. शनिवारी (दि. 22 ऑगस्ट) – अवसरी खुर्द, मंचर, शेवाळवाडी, खडकवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, वडगाव काशिंबेग, चिंचोली, खडकी, कारेगाव, पेठ, महाळुंगे पडवळ, भराडी, वळती, थुगाव, काळेवाडी/दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ/शिंदेवाडी, कोलदरा/गोनवडी येथील ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असून प्रशासक नेमण्यात येणार आहेत.