नवी दिल्ली – अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह गुजरातमधील मुंद्रा येथे जगातील सर्वात मोठा सिंगल-लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बांधत आहे. या प्लांटमुळे भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात आणि ऊर्जा संक्रमणामध्ये मदत होईल.
१.२ अब्ज अमेरिकी डाॅलर्स इतक्या प्रचंड गुंतवणुकीतूनतौभारण्यात येत असलेला हा प्लांट मार्च अखेरपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम सुरू करेल. किमान १० लाख टन क्षमतेसह हा प्लांट मार्च २०२९ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
चीन आणि इतर देशांप्रमाणे, भारत देखील जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा धातू असलेल्या तांब्याचे उत्पादन वेगाने वाढवत आहे. इलेक्ट्रिक वाहने, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सोलर फोटोव्होल्टेइक (विद्युत), पवन उर्जा आणि बॅटरी यासारख्या ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांना तांब्याची आवश्यकता असते.
कच्छ कॉपर लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ची उपकंपनी, दोन टप्प्यांत १ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा तांबे शुद्धीकरण प्रकल्प उभारत आहे. यासाठी केसीएलने जून २०२२ मध्ये वित्तपुरवठा केला होता.