नवी दिल्ली – अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमध्ये हौथींच्या ठिकाणांवर पुन्हा नव्याने हल्ल्यांना सुरुवात केली आहे. शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या हौथींवरच्या हल्ल्याच्या दुसर् या टप्प्यामध्ये येमेनमधील हौथींचे नियंत्रण असलेल्या किमान ३० ठिकाणी बॉम्बफेक केली गेली आहे. येमेनमधून कार्यरत असलेल्या आणि लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले करणार् या हौथी बडखोरांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले केले गेले अमेरिका आणि ब्रिटनच्या युद्धनौका आणि लडाऊ विमानांनी हे हल्ले केले.
एक दिवस आगोदर म्हणजे शुक्रवारी अमेरिका आणि ब्रिटनच्या लडाऊ विमानांनी इराक आणि सीरियामधील दहशतवाद्यांच्या तळांवरही जोरदार हवाई हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने देखील जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तळावरील ३ सैनिक ठार झाले होते.
हौथींच्या वेगवेगळ्या ठिकाणांना अमेरिका आणि ब्रिटनने लक्ष्य केले होते आणि यूएसएस ड्वाइट डी. आयझेनहॉवर विमानवाहू युद्धनौकेवरील लढाऊ विमानांनी आणि लाल समुद्रातून अमेरिकन युद्धनौकांवरून टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली गेली, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.