मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाद्वारे काही दिवसांपूर्वी तिने चाहत्यांनी ही माहिती दिली होती. स्वरा भास्कर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यानंतरच गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मात्र अनेकदा ती ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकतेच स्वराने तिचा बेबी बंप दाखवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये स्वरा भास्करने काळ्या आणि निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती यात मेकअपशिवाय दिसत आहे. गरोदरपणाचे दिवस ती एंजॉय करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप आनंदी असल्याचेही पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजकाल मॅटर्निटी वेअरचा वर्षाव होत आहे. नवीन आणि अतिशय आरामदायक वॉर्डरोबसाठी धन्यवाद..’
View this post on Instagram
दरम्यान, स्वराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 6 जून रोजी एका फोटोसह तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांचे एकाच वेळी उत्तर दिले जाते! आशीर्वाद द्या, कृतज्ञ, उत्साही! आम्ही संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवत आहोत.” यासोबतच तिने ‘कमिंग सून’, ‘कुटुंब, ‘ऑक्टोबर बेबी’, असेही पोस्टमध्ये लिहिले होते. तिच्या पोस्टवर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
स्वराने फेब्रुवारीमध्येच बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले. कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली होती. स्वराचा पती फहाद अहमद समाजवादी पक्षाचे नेते आहे. मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती.