मुंबई – एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने बलात्कार झाल्याची तक्रार केल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने टांझानियामध्ये राहणाऱ्या एनआरआय व्यावसायिकावर लैंगिक छळ आणि अत्याचाराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी व्यापारी वीरेन पटेल याच्याविरुद्ध कलम ३७६(२)(एन), ३२३ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले की, एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये ती अंधेरी भागात एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती जिथे तिची आरोपी वीरेन पटेलशी भेट झाली. “त्याने माझा मोबाईल नंबर मागितला आणि मी तो दिला. त्यानंतर त्याने मला फोन करून मेसेज पाठवायला सुरुवात केली ज्यामुळे आमची मैत्री झाली.” अशी माहिती पीडितेने दिली.
पीडित पुढे म्हणाली, ”आम्ही एकमेकांना मदत करण्याबद्दल बोलू लागलो, बिझनेसबद्दल बोलू लागलो, त्यामुळे आमचं नातं वाढत गेलं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी मला लोअर परळ येथील त्यांच्या फ्लॅटवर बोलावले आणि मला त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले. तिथे त्याने मला लग्नासाठी विचारणाही केली. आम्ही दोघे अविवाहित होतो आणि गुजराती समाजातील होतो, म्हणूनच मी हो म्हणाले. मी माझ्या घरच्यांना याची माहिती दिली आणि माझ्या कुटुंबियांना वीरेनबद्दल सांगितलं.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, “28 मार्च 2023 रोजी वीरेन दारूच्या नशेत आला होता. तो त्याच्या बेडरूममध्ये झोपायला गेला आणि मी माझ्या बेडरूममध्ये गेली. रात्री अचानक तो माझ्या खोलीत रडत रडत आला आणि मला मिस करत असल्याचे सांगू लागला. त्यानंतर तो माझ्याच बेडवर झोपला आणि त्यानंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती केली असल्याचे अभिनेत्रीने म्हंटले.
“सकाळी जेव्हा मी रडायला लागले तेव्हा त्याने सांगितले की डिसेंबर महिन्यात आपण लग्न करणार आहोत आणि मला शांत केले. त्यानंतर 11 एप्रिल रोजी त्याने मला अलिबाग येथील त्याच्या एका मित्राच्या फार्महाऊसवर नेले आणि तेथे माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिल्यावर त्याने माझ्यावर हल्ला केला.” अशा अनेक प्रसंगी त्याने माझे शोषण केले आणि मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्रीने यावेळी केला आहे.
या मारहाणीमुळे आणि मानसिक छळाला कंटाळून पीडित मॉडेलने आरोपी वीरेन विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३२३ आणि ५०४ अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.