मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम सध्या ‘थंगलान’ या चित्रपटाच्या शूटिंग व्यस्त आहे. मात्र या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या एका सीनदरम्यान त्याला जबर मार लागल्याने त्याचया बरगड्या तुटल्या असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे आता विक्रम काही दिवस शूटींगमधून ब्रेक घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.
विक्रमच्या मॅनेजरने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘शूटिंगदरम्यान विक्रमला मार लागल्याने विक्रमची बरगडी तुटली आहे. त्यामुळे तो काही काळासाठी थंगलानची शूटिंग करू शकणार नाही. पण लवकरच तो पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल, असं ट्विट मॅनेजरने केलं आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
थंगालन हा चित्रपट केजीएफच्या सत्यकथेवर आधारित आहे. ‘थंगलान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन पी. रंजीत यांनी केले आहे. कोलार सोन्याच्या खाणीशी संबंधित कथा या चित्रपटात पाहता येणार आहे. या चित्रपटात चियान विक्रमसह मालविका मोहनन आणि पार्वती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेतू’ या चित्रपटामुळे विक्रम प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
Thank you for all the love and appreciation Aditha Karikalan aka Chiyaan Vikram has received and for the astounding response to PS2 from all over the world. Chiyaan sustained an injury during rehearsals resulting in a broken rib due to which he will not be able to join his…
— Suryanarayanan M (@sooriaruna) May 3, 2023
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओमध्ये अॅक्शन सीनसाठी कशी तयारी करण्यात आली होती हे दाखवण्यात आले होते. विक्रम थंगालनच्या भूमिकेसाठी तयार होऊन शूटिंग करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दाखवले होते. यावरून चित्रपटाच्या संपूर्ण टीमने तगडी मेहनत केल्याचे दिसते. मात्र याच दरम्यान विक्रमला दुखापत झाल्याने चाहते त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहे.