मुंबई – मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासह दिग्दर्शनम लिखाण, कविता आणि सूत्रसंचालन या गोष्टींमध्ये देखील सरस आहे. त्याच्या याच शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर संकर्षणच्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. संकर्षणाच्या या व्हिडीओत तो कुक बनला असल्याचे दिसते.
संकर्षणने इनस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. संकर्षण सध्या अमेरिकामध्ये त्याच्या ओळखीच्या राजमाने यांच्या घरी राहत आहे. त्यांच्या घरात त्यानं फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी बनवली आहे. याचा फोटो त्याने शेअर केला आहे. त्याची ही पाककला पाहून सर्वच जण थक्क झाले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, “आम्ही सारे खवय्ये इन अमेरिका. अमोल राजमाने आणि शुभदा राजमाने यांच्या घरी राहतोय…आज त्यांच्या स्वयंपाकघरात लुडबूड केली. मज्जा आली.”
View this post on Instagram
हा व्हिडिओ पाहून संकर्षणचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. ‘मस्त रेसिपी’, ‘खूप छान’ अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान संकर्षणचं सध्या ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर सुपरहिट ठरत आहे. या नाटकामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री अमृता देशमुख प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय संकर्षण लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.