नवी दिल्ली: तापमानात होणाऱ्या वाढीबरोबरच घर, कार्यालय आणि रुग्णालयांमध्ये एअर कंडिशनर (एसी) सिस्टिमची गरज भासू लागली आहे. घरातील रूम एअर कंडिशनरच्या वापरावरून वादविवाद निर्माण झाले आहे. त्यामुळे सामाजिक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देश्याने रेफ्रिजरेशन आणि एसी मॅन्यूफक्चरिंग असोसियशन (आरएएमए)ने सोमवारी घोषणा केली आहे की, एअर कंडिशनर कोविड-19 संसर्ग पसरण्यास कोणताही धोका उत्पन्न करीत नाही. काही खबरदारी घेऊन घर, कार्यालयांमध्ये एसीचा वापर करणे सुरक्षित आहे.
आरएएमएचे अध्यक्ष आणि जॉनसन-हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष गुरमित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असोसियशनच्या सदस्यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान ही घोषणा केली. आरएएमएने म्हटले आहे की, एसी वापरल्यामुळे करोनाचा संसर्ग वाढतो असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र एसीमुळे करोना विषाणूचा संसर्ग पसरत नसल्याची पुष्टी दिली आहे.