मुंबई – सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्याचे निकष वेगवेगळे असतात. मात्र, तरीही विज्ञानाने सुंदर महिलांची गणती करताना काही विशिष्ट निकष बनवले आहेत. ग्रीक सौंदर्याच्या मापदंडानुसार २३ वर्षांची सुपरमॉडेल बेला हदिद (Bel’a Hadid) ही जगातील सर्वात सुंदर महिला ठरली आहे. तिच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
‘गोल्डन रेशियो ऑफ ब्यूटी फी स्टँडर्स’च्या मापदंडानुसार व्हिकटोरीया सेक्रेट मॉडेल बेला हदिदचा चेहरा सुंदर महिलांच्या मापदंडामध्ये जवळपास फिट बसतो आणि म्हणूनच ती जगातील सर्वात सुंदर महिला ठरली आहे. ग्रीक गणितपद्धतीनुसार गोल्डन रेशियो ऑफ ब्यूटी फीने सौंदर्याचे काही मापदंड तयार केले आहेत. या मापदंडामध्ये २३ वर्षीय बेलाचा चेहरा ९४.३५ टक्के जुळत असल्याचे म्हटले आहे.