व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टॅक्स; ठिकठिकाणी निदर्शने  

नवी दिल्ली – जगातील सर्वात जास्त इंटरनेट युजर्स हे भारतात आहेत. ६३ कोटींपेक्षा अधिक भारतीय इंटरनेटचा वापर करतात. आणि आता सोशल मीडियावरच कर लागला तर? कल्पनाही करवत नाही ना. परंतु, हा कर भारत सरकार लावत नसून लेबनॉन सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलींगवर कर लावला आहे. सोशल मीडियावर कराविरोधात लोकांनी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिंसक निदर्शने केली आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर ४० सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. याशिवाय विमानतळावर अनेक प्रवाशांना मारहाण करण्यात आली आहे.

माहितीनुसार, लेबनॉन सरकार सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. सरकारला अर्थसंकल्पसाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलींगवर १५० रुपयांचा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लेबनॉनमध्ये नाराजी पसरली असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अखेर लेबनॉन सरकारने आपला निर्णय मागे घेतला.

दरम्यान, लेबनॉन हा पहिलाच देश नाहीतर युगांडामध्येही सोशल मीडियावर कर आकारला जातो. युगांडाच्या संसदेत मागील वर्षी हे विधयेक मंजूर करण्यात आले. यानुसार व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलींगसाठी ३ रुपये ३६ पैसे कर म्हणून द्यावा लागतो. यामुळे अफवा थांबवण्यासाठी मदत होईल, असा अंदाज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)