ठाणे – मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला आहे. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुदैवी घटनेनंतर आज पुन्हा एकदा ठाण्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी बसमध्ये 9 प्रवासी होते. या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. MH 14 BT 4489 या क्रमांकाची एसटी बस घेऊन बोरीवलीला निघाली होती. त्यादरम्यान, ज्युपिटर हॉस्पिटल समोर बसने पुढे असलेल्या कंटनेरला एसटीने मागून धडक दिली. मागून धडक दिली. यात बसचे वाहक परब आणि डोंबिवली कोपर, आयरे गाव येथील प्रवासी महिला कदम असे दोघे त्या अपघात जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे.
दरम्यान, हा अपघात सकाळी झाल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवली. त्यानंतर वाहतुकीला मार्ग मोकळा करून देत वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली.