पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. एकूण 63,229 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी मतदान होणार आहे. पंचायत समितीच्या ९ हजार ७३० आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, सीताई, कूचबिहारमध्ये, पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना, अज्ञात व्यक्तीने बूथ 6/130, बारविता प्राथमिक शाळेची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
#WATCH सीताई, कूच बिहार: पश्चिम बंगाल पंचायत चुनाव के लिए मतदान शुरू हो गए हैं। अज्ञात उपद्रवियों ने कथित तौर पर 6/130 बूथ, बरविटा प्राइमरी स्कूल में तोड़फोड़ की। pic.twitter.com/aQKg7HHlT7
— ANI_HindiNews (@AHindinews) July 8, 2023
पश्चिम बंगालमध्ये पंचायत प्रतिनिधी निवडण्यासाठी आज सकाळी मतदान सुरू असताना हिंसाचारामुळे झालेल्या संघर्षात किमान तीन जण ठार झाले. शनिवारी मतदान सुरू होण्यापूर्वीच उत्तर 24 परगणामधील कदमबागाची येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हा व्यक्ती परिसरातील अपक्ष उमेदवाराचा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया पुढे जात असताना मालदा आणि कूचबिहारमध्ये हिंसाचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भाजप आणि तृणमूलचा एक कार्यकर्ता ठार झाला.