पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका कारला भीषण अपघात झाला. मुंबई लेनसमोर चाललेल्या टँकरला स्विफ्ट कारने मागील बाजूने धडक दिल्याने सदर अपघात झाला. या अपघातात ४ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना घडली.
मयत व्यक्तीमध्ये ३ महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्वजण सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबई येथे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. हे सर्वजण नातेसंबंधांतील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच रोडवेज पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, हायवे पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी घटनास्थळी पोचून मदतकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित एमजीएम पनवेल येथे हलविण्यात आले आहे.